Skip to content

Brick बद्दल बायबलमधील वचने

13 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. “यापुढे लोकांना विटा तयार करण्यासाठी गवत देऊ नका; आपल्यासाठी गवत त्यांनी स्वतःच गोळा करावे.

  2. तरीही पूर्वी ते जितक्या विटा तयार करीत होते तितक्या त्यांनी केल्याच पाहिजे; त्यात घट होऊ नये. ते आळशी आहेत; म्हणूनच, ‘आम्हाला रानात जाऊन आमच्या परमेश्वराला यज्ञ करू दे,’ अशी ओरड करीत आहेत.

  3. त्यांच्यासाठी काम अजून कठीण करा, म्हणजे ते काम करत राहतील व खोट्या गोष्टींकडे ते लक्ष देणार नाहीत.”

  4. तेव्हा मुकादम व पुढारी यांनी इस्राएली लोकांना सांगितले, “फारोहने असे सांगितले आहे की मी तुम्हाला यापुढे गवत देणार नाही.

  5. तर जाऊन मिळेल तिथून आपल्यासाठी गवत शोधून आणा, मात्र तुमचे काम मुळीच कमी करण्यात येणार नाही.”

  6. तेव्हा लोक गवत गोळा करून आणण्यासाठी इजिप्तभर पांगले.

  7. मुकादम त्यांना जोर देऊन म्हणत होते, “गवत असताना जेवढे काम करीत होते तितकेच नेमून दिलेले काम रोज झाले पाहिजे.”

  8. फारोहच्या मुकादमांनी इस्राएली गटांवर नेमलेल्या पुढार्‍यांना मार देऊन विचारले, “पूर्वीप्रमाणे, काल व आज तुम्हाला नेमून दिलेले विटा तयार करण्याचे काम तुम्ही का पूर्ण केले नाही?”

  9. तेव्हा इस्राएलांचे पुढारी फारोहकडे जाऊन त्याला विनवून म्हणाले, “तुम्ही आपल्या सेवकांशी असे निष्ठुरपणे का वागता?

  10. तुमच्या दासांना गवत नाही, तरीही ‘विटा तयार करा!’ असे सांगितले जाते, तुमच्या सेवकांना मारहाण करण्यात येते, परंतु सगळा दोष तुमच्याच लोकांचा आहे.”

  11. फारोहने उत्तर दिले, “तुम्ही आळशी लोक आहात—आळशी! म्हणून तुम्ही म्हणता, ‘आम्हाला याहवेहपुढे यज्ञ करावयास जाऊ द्यावे.’

  12. आता आपले काम करा. तुम्हाला गवत पुरविले जाणार नाही, तरी नेमल्याप्रमाणेच विटा तयार करून द्याव्या लागतील.”

  13. “तुम्हाला नेमून दिल्याप्रमाणे रोजचे विटा बनविण्याचे काम कमी केले जाणार नाही,” असे ऐकल्यावर आपण अडचणीत सापडलो आहोत, असे इस्राएली पुढाऱ्यांच्या लक्षात आले.