Skip to content

Bribery बद्दल बायबलमधील वचने: General references

10 वचने · 1 पैलू

General references बद्दल वचने

  1. याहवेह तुमचे परमेश्वर जी सर्व शहरे तुमच्या प्रत्येक गोत्राला देणार आहेत, त्या सर्व शहरांमध्ये न्यायाधीश आणि शास्ते यांची तुम्ही नेमणूक करावी व त्यांनी लोकांचा न्याय नीतीने करावा.

  2. भेदभाव किंवा विपरीत असा न्याय कधीही करू नये. लाच घेऊ नये, कारण लाच ही शहाण्या माणसांना आंधळे करते आणि निरपराध्याचे शब्द विपरीत करते.

  3. पातकी लोकांसोबत माझ्या जीवाला, आणि रक्तपिपासू लोकांसोबत माझे प्राण घेऊ नका.

  4. त्यांच्या हातात दुष्ट योजना आहेत, त्यांचा उजवा हात लाचेने भरलेला आहे.

  5. धिक्कार असो, जे मद्य पिण्यामध्ये वीर आहेत आणि पेय मिसळण्यात जे विजयीवीर आहेत,

  6. लाच घेऊन दुष्टाला जे सोडून देतात, परंतु निर्दोषांना योग्य न्यायापासून वंचित करतात.

  7. जे नीतीने चालतात आणि जे योग्य तेच बोलतात, जे पिळवणूक करून मिळविलेला लाभ नाकारतात आणि लाच घेण्यापासून त्यांचे हात लांब ठेवतात, खुनाच्या कारस्थानाबाबत जे त्यांचे कान बंद ठेवतात दुष्टतेचा बेत करण्याबाबत त्यांचे डोळे बंद करतात—

  8. ज्यांचा आश्रय पर्वतावरील गड असेल, तेच उच्चस्थानी वास करतील. त्यांच्या भाकरीचा पुरवठा केला जाईल, आणि त्यांना पाण्याची कमतरता पडणार नाही.

  9. तुझ्यात लोक आहेत, जे रक्तपात करण्यास लाच घेतात; तू व्याज घेते आणि गरिबांकडून नफा करून घेतेस. तू आपल्या शेजार्‍याकडून जबरीने वसूल करून लाभ घेतेस. आणि तुला माझा विसर पडला आहे, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  10. “ ‘अन्यायाने तू जो लाभ करून घेतला आहे, आणि तुमच्यात जो रक्तपात तू केला आहे, त्यामुळे संतापाने मी माझे हात एकत्र चालवेन.