मुख्य मजकुरावर जा

Breastplate बद्दल बायबलमधील वचने: Inseparably united to the ephod

14 वचने · 16 पैलू

Inseparably united to the ephod बद्दल वचने

  1. “ऊरपटासाठी पीळ घातलेल्या दोरीप्रमाणे शुद्ध सोन्याच्या साखळ्या कराव्या.

  2. ऊरपटाच्या दोन्ही टोकास लावण्यासाठी सोन्याच्या दोन कड्या बनवाव्या.

  3. त्या सोन्याच्या दोन साखळ्या ऊरपटाच्या टोकाला असलेल्या कड्यांमध्ये घालाव्या,

  4. आणि साखळीची दुसरी दोन टोके साच्यात घालून एफोदाच्या समोरील बाजूने त्याच्या खांदेपट्टीला जोडून घ्याव्या.

  5. सोन्याच्या दोन कड्या तयार कर व त्या ऊरपटाच्या दुसर्‍या दोन कोपर्‍यांना म्हणजे एफोदा जवळील आतील बाजूच्या काठाला जोडाव्या.

  6. सोन्याच्या आणखी दोन कड्या करून त्या त्या एफोदाच्या खांदेपट्टीच्या खालच्या बाजूने समोरून, एफोदाच्या कमरबंदाच्या अगदी वर असलेल्या काठाला जोडाव्या.

  7. ऊरपटाच्या कड्या एफोदाच्या कड्यांना निळ्या दोरीने, कमरबंदाला जोडतील अशा बांधाव्या, म्हणजे ऊरपट एफोदावरून सरकणार नाही.

  8. त्यांनी ऊरपटासाठी पीळ घातलेल्या दोरीप्रमाणे शुद्ध सोन्याच्या साखळ्या तयार केल्या.

  9. त्यांनी सोन्याची दोन कोंदणे व सोन्याच्या दोन कड्या बनविल्या, त्या दोन कोंदणांमध्ये घालून ऊरपटाच्या दोन्ही टोकास बसविल्या.

  10. त्यांनी त्या सोन्याच्या दोन साखळ्या ऊरपटाच्या टोकाला असलेल्या कड्यांमध्ये बसविल्या,

  11. आणि साखळीची दुसरी दोन टोके साच्यात घालून एफोदाच्या समोरील बाजूने त्याच्या खांदेपट्टीला जोडले.

  12. त्यांनी सोन्याच्या दोन कड्या तयार केल्या व त्या ऊरपटाच्या दुसर्‍या दोन कोपर्‍यांना म्हणजे एफोदा जवळील आतील बाजूच्या काठाला जोडल्या.

  13. मग त्यांनी सोन्याच्या आणखी दोन कड्या बनविल्या व त्या एफोदाच्या खांदेपट्टीच्या खालच्या बाजूने समोरून जोडल्या, एफोदाच्या कमरबंदाच्या अगदी वर असलेल्या काठाला जोडल्या.

  14. त्यांनी त्या ऊरपटाच्या कड्या एफोदाच्या कड्यांना निळ्या दोरीने कमरबंदाला अशा बांधाव्या की ऊरपट एफोदावरून सरकणार नाही; हे त्यांनी याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे केले.