Skip to content

Breastplate बद्दल बायबलमधील वचने

19 वचने · 16 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. मग त्यात चार रांगेत मोलवान रत्ने लावावी. पहिल्या रांगेत लाल, पुष्कराज व माणिक ही रत्ने असावी;

  2. दुसर्‍या रांगेत पाचू, नीलमणी व हिरे असावे;

  3. तिसर्‍या रांगेत तृणमणी, सूर्यकांत व पद्मराग ही असावीत;

  4. चौथ्या रांगेत लसणा, गोमेद व यास्फे असावीत. ही सर्व रत्ने सोन्याच्या कोंदणात बसवावीत.

  5. इस्राएलाच्या पुत्रातील प्रत्येकाच्या नावाने एक अशी बारा रत्ने असावीत, प्रत्येक रत्नावर इस्राएलाच्या बारापैकी एका गोत्राचे नाव मुद्रेप्रमाणे कोरले जावे.

  6. “ऊरपटासाठी पीळ घातलेल्या दोरीप्रमाणे शुद्ध सोन्याच्या साखळ्या कराव्या.

  7. ऊरपटाच्या दोन्ही टोकास लावण्यासाठी सोन्याच्या दोन कड्या बनवाव्या.

  8. त्या सोन्याच्या दोन साखळ्या ऊरपटाच्या टोकाला असलेल्या कड्यांमध्ये घालाव्या,

  9. आणि साखळीची दुसरी दोन टोके साच्यात घालून एफोदाच्या समोरील बाजूने त्याच्या खांदेपट्टीला जोडून घ्याव्या.

  10. सोन्याच्या दोन कड्या तयार कर व त्या ऊरपटाच्या दुसर्‍या दोन कोपर्‍यांना म्हणजे एफोदा जवळील आतील बाजूच्या काठाला जोडाव्या.

  11. सोन्याच्या आणखी दोन कड्या करून त्या त्या एफोदाच्या खांदेपट्टीच्या खालच्या बाजूने समोरून, एफोदाच्या कमरबंदाच्या अगदी वर असलेल्या काठाला जोडाव्या.

  12. ऊरपटाच्या कड्या एफोदाच्या कड्यांना निळ्या दोरीने, कमरबंदाला जोडतील अशा बांधाव्या, म्हणजे ऊरपट एफोदावरून सरकणार नाही.

  13. त्यांनी ऊरपटासाठी पीळ घातलेल्या दोरीप्रमाणे शुद्ध सोन्याच्या साखळ्या तयार केल्या.

  14. त्यांनी सोन्याची दोन कोंदणे व सोन्याच्या दोन कड्या बनविल्या, त्या दोन कोंदणांमध्ये घालून ऊरपटाच्या दोन्ही टोकास बसविल्या.

  15. त्यांनी त्या सोन्याच्या दोन साखळ्या ऊरपटाच्या टोकाला असलेल्या कड्यांमध्ये बसविल्या,

  16. आणि साखळीची दुसरी दोन टोके साच्यात घालून एफोदाच्या समोरील बाजूने त्याच्या खांदेपट्टीला जोडले.

  17. त्यांनी सोन्याच्या दोन कड्या तयार केल्या व त्या ऊरपटाच्या दुसर्‍या दोन कोपर्‍यांना म्हणजे एफोदा जवळील आतील बाजूच्या काठाला जोडल्या.

  18. मग त्यांनी सोन्याच्या आणखी दोन कड्या बनविल्या व त्या एफोदाच्या खांदेपट्टीच्या खालच्या बाजूने समोरून जोडल्या, एफोदाच्या कमरबंदाच्या अगदी वर असलेल्या काठाला जोडल्या.

  19. त्यांनी त्या ऊरपटाच्या कड्या एफोदाच्या कड्यांना निळ्या दोरीने कमरबंदाला अशा बांधाव्या की ऊरपट एफोदावरून सरकणार नाही; हे त्यांनी याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे केले.