Skip to content

Baruch बद्दल बायबलमधील वचने

40 वचने · 3 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. राजा व त्याच्या इतर सर्व सेवेकऱ्यांनी हे ऐकल्यानंतर भय वाटल्याचे दर्शविले नाही वा संतापाने आपले वस्त्र फाडले नाही.

  2. त्यावेळी एलनाथान, दलायाह व गमर्‍याह या तिघांनी हे चर्मपत्र जाळू नये असे राजाला परोपरीने विनविले, परंतु राजाने त्यांचे ऐकले नाही.

  3. याउलट, राजाने राजपुत्र यरहमेल, अज्रीएलचा पुत्र सेरायाह व अब्देलचा पुत्र शेलेम्याह यांना हुकूम केला की त्यांनी नेरीयाहचा पुत्र लेखनिक बारूख व यिर्मयाह संदेष्टा यांना अटक करावी. परंतु याहवेहने त्यांना लपवून ठेवले.

  4. राजाने यिर्मयाह संदेष्ट्याला सांगून नेरीयाहचा पुत्र बारूखाने लिहिलेली वचने असलेले ते चर्मपत्र जाळून टाकल्यावर, यिर्मयाहला याहवेहची वचने आली:

  5. “दुसरे एक चर्मपत्र घे व त्यावर यहूदीयाचा राजा यहोयाकीमने जाळून टाकलेल्या पहिल्या चर्मपत्रावर लिहिलेली सर्व वचने लिहून काढ.

  6. याशिवाय यहूदीयाचा राजा यहोयाकीमला सांग, ‘याहवेह असे म्हणतात: तू ते चर्मपत्र जाळले व म्हटले, “बाबेलचा राजा निश्चितच येईल व हा देश नष्ट करेल आणि मनुष्य व पशूंना पूर्णपणे नाहीसे करेल, असे त्या चर्मपत्रावर का लिहिले?”

  7. म्हणून यहूदीयाचा राजा यहोयाकीमविषयी, याहवेह असे म्हणतात: दावीदाच्या राजासनावर बसण्यासाठी त्याला कोणीही वारस असणार नाही; त्याचे प्रेत बाहेर दिवसा उन्हामध्ये व रात्रीच्या हिवात पडून राहील.

  8. मी त्याला, त्याच्या लेकरांना व त्याच्या सेवेकऱ्यांना त्यांच्या सर्व दुष्टतेकरिता शिक्षा देईन; मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे त्यांच्यावर, तसेच यहूदीयात राहणाऱ्या लोकांवर व यरुशलेम येथील सर्व लोकांवर घोषित केलेली अरिष्टे आणेन, कारण त्यांनी माझे ऐकले नाही.’ ”

  9. मग यिर्मयाहने पुन्हा दुसरे चर्मपत्र घेतले, यहूदीयाचा राजा यहोयाकीमने जाळलेल्या चर्मपत्रावर लिहिलेली सर्व वचने नेरीयाहचा पुत्र लेखनिक बारूखाला पुन्हा सांगून त्याच्याकडून लिहून घेतली. आणि त्यासारख्या आणखी पुष्कळ वचनाची त्यामध्ये भर घातली गेली.

  10. नेरीयाहचा पुत्र नेरीयाहचा पुत्र बारूख याने तुला हे आम्हास सांगण्यास चिथविले आहे, म्हणजे आम्ही येथेच राहू आणि बाबिलोनच्या सैन्याकडून मारले जाऊ किंवा गुलाम करून बाबेलला नेले जाऊ.”

  11. अशाप्रकारे कारेहचा पुत्र योहानान, सर्व सेनाप्रमुख व सर्व लोकांनी यहूदीयात राहण्याची याहवेहची अवज्ञा केली.

  12. यहूदीया जे इतर देशात विखुरलेले पण आता परत आलेल्या सर्व उरलेल्या लोकांना कारेहचा पुत्र योहानान, सर्व सेनाप्रमुख आपल्या देखरेखीत घेऊन निघाले.

  13. त्या जमावात पुरुष, स्त्रिया, मुले, राजाच्या कन्या व तसेच पहारेकऱ्यांचा नायक नबुजरदान याने अहीकामचा पुत्र, शाफानचा नातू गदल्याहच्या स्वाधीन केलेले सर्व लोक होते. त्यांनी यिर्मयाह संदेष्टा व नेरीयाहचा पुत्र बारूख ह्यांनाही आपल्याबरोबर घेतले.

  14. यहूदीयाचा राजा योशीयाहचा पुत्र, यहोयाकीम राजा, याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी, यिर्मयाह संदेष्ट्याने सांगितलेली याहवेहची सर्व वचने लिहून घेण्याचे काम नेरीयाहचा पुत्र बारूखाने संपविल्यानंतर, यिर्मयाहने हा संदेश त्याला दिला:

  15. “हे नेरीयाहचा पुत्र बारूखा, याहवेह इस्राएलाचे परमेश्वर तुला असे सांगत आहेत: