मुख्य मजकुरावर जा

Gemariah

4 वचने · 4 कुटुंब सदस्य

Gemariah चा उल्लेख असलेली वचने

  1. शाफानचा पुत्र गमर्‍याह चिटणीस, याच्या याहवेहच्या मंदिरात वरच्या सभागृहाच्या बाजूस नव्या द्वारातील प्रवेशमार्गाजवळील कचेरीमध्ये नेरीयाहचा पुत्र बारूख यिर्मयाहची वचने लिहिलेले हे चर्मपत्र वाचण्यासाठी गेला.

  2. शाफानचा नातू, गमर्‍याहचा पुत्र, मिखायाह याने चर्मपत्रावर लिहिलेली याहवेहची सर्व वचने ऐकली,

  3. तेव्हा तो राजवाड्यातील चिटणीसाच्या दालनात खाली गेला, तिथे सर्व अधिकारी—एलीशामा चिटणीस, शमायाहचा पुत्र दलायाह, अकबोरचा पुत्र एलनाथान, शाफानचा पुत्र गमर्‍याह, हनन्याहचा पुत्र सिद्कीयाह व तसेच इतर सर्व वरिष्ठ अधिकारी मसलतीसाठी जमले होते.

  4. त्यावेळी एलनाथान, दलायाह व गमर्‍याह या तिघांनी हे चर्मपत्र जाळू नये असे राजाला परोपरीने विनविले, परंतु राजाने त्यांचे ऐकले नाही.