मुख्य मजकुरावर जा

Baruch बद्दल बायबलमधील वचने: 1. An amanuensis of Jeremiah

40 वचने · 3 पैलू

1. An amanuensis of Jeremiah बद्दल वचने

  1. आणि सर्वांसमक्ष, माझा चुलतभाऊ हानामेल, खरेदीखतावर सह्या करणारे साक्षीदार त्यांच्या समक्ष व सर्व यहूदी पहारेकऱ्यांच्या चौकात बसले असताना, ती कागदपत्रे बारूख, जो नेरीयाहचा पुत्र, महसेयाहचा नातू, याच्या स्वाधीन केली.

  2. “सर्व लोक ऐकत असताना मी नेरीयाहचा पुत्र बारूखाला या सूचना दिल्या:

  3. ‘सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: मोहोरबंद खरेदीखत व त्याची प्रत ही दोन्हीही घेऊन दीर्घकाळापर्यंत टिकून राहवी म्हणून ती मातीच्या एका पात्रात घालून ठेव.

  4. कारण सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: पुढे या देशामध्ये पुन्हा घरेदारे, शेते, द्राक्षमळे यांची खरेदी करण्यात येईल.’

  5. “मग खरेदीखत नेरीयाहचा पुत्र, नेरीयाहचा पुत्र बारूखच्या हवाली केल्यावर मी याहवेहकडे प्रार्थना केली.

  6. तेव्हा यिर्मयाहने नेरीयाहचा पुत्र बारूख, याला बोलावून त्याला याहवेहने सांगितलेली सर्व वचने बोलून दाखविली आणि बारूखने ते चर्मपत्रावर लिहिले.

  7. मग यिर्मयाह नेरीयाहचा पुत्र बारूखला म्हणाला, “माझ्यावर इथे प्रतिबंध लावण्यात आला आहे; मला याहवेहच्या मंदिरात जाण्याची परवानगी नाही.

  8. म्हणून उपवासाच्या दिवशी तू याहवेहच्या मंदिरात जा आणि मी सांगून तू चर्मपत्रावर लिहिलेली याहवेहची वचने वाचून दाखव. त्या दिवशी यहूदीया प्रांताच्या नगरांतून आलेल्या सर्व लोकांना वाचून दाखव.

  9. कदाचित ते याहवेहकडे क्षमेची याचना करतील व आपल्या दुष्ट मार्गापासून वळतील, कारण या लोकांविरुद्ध याहवेहने उच्चारलेले संताप व प्रकोप अत्यंत घोर आहेत.”

  10. यिर्मयाह संदेष्ट्याने सांगितल्याप्रमाणे नेरीयाहचा पुत्र बारूखने ते सर्व केले; याहवेहच्या मंदिरात चर्मपत्रावर लिहिलेली याहवेहची वचने लोकांना वाचून दाखविली.

  11. योशीयाहचा पुत्र राजा यहोयाकीम, याच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षी नवव्या महिन्यात यरुशलेममधील लोकास व जे यहूदीया प्रांतातील नगरातून आले होते, त्या लोकास याहवेहपुढे उपवास करण्याची घोषणा करण्यात आली होती.

  12. शाफानचा पुत्र गमर्‍याह चिटणीस, याच्या याहवेहच्या मंदिरात वरच्या सभागृहाच्या बाजूस नव्या द्वारातील प्रवेशमार्गाजवळील कचेरीमध्ये नेरीयाहचा पुत्र बारूख यिर्मयाहची वचने लिहिलेले हे चर्मपत्र वाचण्यासाठी गेला.

  13. शाफानचा नातू, गमर्‍याहचा पुत्र, मिखायाह याने चर्मपत्रावर लिहिलेली याहवेहची सर्व वचने ऐकली,

  14. तेव्हा तो राजवाड्यातील चिटणीसाच्या दालनात खाली गेला, तिथे सर्व अधिकारी—एलीशामा चिटणीस, शमायाहचा पुत्र दलायाह, अकबोरचा पुत्र एलनाथान, शाफानचा पुत्र गमर्‍याह, हनन्याहचा पुत्र सिद्कीयाह व तसेच इतर सर्व वरिष्ठ अधिकारी मसलतीसाठी जमले होते.

  15. नेरीयाहचा पुत्र बारूखाने चर्मपत्रावर लिहिलेले वाचून दाखविलेले सर्व मिखायाहने त्या अधिकार्‍यांना सांगितले.

  16. तेव्हा अधिकार्‍यांनी कूशीचा पणतू, शेलेम्याहचा नातू, नथन्याहचा पुत्र, यहूदी याच्या हाती नेरीयाहचा पुत्र बारूखला सांगून पाठविले, “तू लोकांना वाचून दाखविलेले चर्मपत्र घेऊन इकडे ये.” त्याप्रमाणे नेरीयाहचा पुत्र बारूख हातात चर्मपत्र घेऊन त्यांच्याकडे गेला.

  17. ते त्याला म्हणाले, “कृपया, बसा, व आम्हाला वाचून दाखवा.” म्हणून नेरीयाहचा पुत्र बारूखाने त्यांना वाचून दाखविले.

  18. जेव्हा त्यांनी ती सर्व वचने ऐकली, तेव्हा सर्व अधिकारी अतिशय भयभीत नजरेने एकमेकांकडे बघू लागले व नेरीयाहचा पुत्र बारूखाला म्हणाले, “या सर्व वचनांचा राजाला अहवाल दिलाच पाहिजे.”

  19. त्यांनी नेरीयाहचा पुत्र बारूखाला विचारले, “आम्हाला सांग, हे सर्व तू कसे काय लिहिले? यिर्मयाहने सांगून तू हे लिहिले का?”

  20. त्यावर नेरीयाहचा पुत्र बारूखने म्हटले, “यिर्मयाहने ही वचने सांगितली व मी ती चर्मपत्रावर शाईने लिहिली.”

  21. अधिकारी नेरीयाहचा पुत्र बारूखला म्हणाले, “तू आणि यिर्मयाह दोघेही लपून राहा. तुम्ही कुठे आहात हे कोणालाही कळवू नका.”

  22. नंतर अधिकार्‍यांनी एलीशामा चिटणीसाच्या खोलीमध्ये ते चर्मपत्र ठेवले आणि राजाला भेटण्यासाठी ते राज्यसभेत गेले व ही सर्व गोष्ट त्यांनी राजाला सांगितली.

  23. मग राजाने यहूदीस ते चर्मपत्र आणण्यासाठी पाठविले, व यहूदीने चिटणीस एलीशामाच्या खोलीमधून ते आणले आणि सर्व अधिकारी राजाजवळ उभे असताना, त्याने तो राजाला वाचून दाखविले.

  24. हा नववा महिना असून राजा राजवाड्याच्या एका खास हिवाळी दालनात शेगडी पुढे घेऊन शेकत बसला होता.

  25. यहूदीने तीन-चार रकाने वाचून संपवली की राजा वाचलेला भाग लेखनिकाच्या चाकूने तेवढा कापून विस्तवात टाकी. असे संपूर्ण चर्मपत्र जळून नष्ट झाले.