Skip to content

Assault and Battery बद्दल बायबलमधील वचने

15 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. “जर लोक आपसात भांडत असताना एकाने दुसर्‍याला दगडाने किंवा बुक्कीने मारले आणि पीडित व्यक्ती मेली नाही, परंतु आपले अंथरूण धरून राहिली,

  2. आणि जर उठून काठीच्या आधाराने बाहेर चालू शकेल तर ज्याने मारले तो दंडास पात्र नसून निर्दोष असेल; मात्र दोषी व्यक्तीने इजा झालेल्या व्यक्तीला नुकसान भरपाई व तो व्यक्ती बरा होईपर्यंत सर्व खर्च द्यावा.

  3. “कोणी मारामारी करीत असताना एखाद्या गरोदर स्त्रीला धक्का लागला व त्यामुळे तिचा गर्भपात झाला, पण तिला गंभीर इजा झाली नाही, तर तिचा पती मागेल व न्यायाधीश मान्य करेल तितकी रक्कम अपराध्याने द्यावी.

  4. परंतु इजा जर गंभीर आहे, तर तुम्ही जिवाबद्दल जीव,

  5. डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, हाताबद्दल हात, पायाबद्दल पाय,

  6. चटक्याबद्दल चटका, जखमेबद्दल जखम किंवा इजेबद्दल इजा द्यावी.

  7. “एखाद्या धन्याने आपल्या गुलाम स्त्री किंवा पुरुषाच्या डोळ्यांवर मारून तो फोडला तर डोळ्याची भरपाई म्हणून त्याने त्यांना स्वतंत्र करावे.

  8. एखादा धनी जो आपल्या गुलाम पुरुष किंवा स्त्रीचा दात पाडतो, तर दाताची भरपाई म्हणून त्याने त्यांना स्वतंत्र करावे.

  9. तुमच्या न्यायालयात खटले येतात, ज्यांचा निवाडा करण्याचे काम तुमच्या आवाक्याबाहेरचे असेल—मग ते रक्तपात असो, फिर्याद अथवा मारामारी असोत—याहवेह तुमच्या परमेश्वराने निवडलेल्या स्थानी तुम्ही तो वाद न्यावा.

  10. त्याकाळी जे लेवी याजक किंवा न्यायाधीश आपल्या पदावर असतील, त्यांच्याशी तुम्ही मसलत करावी आणि ते त्या वादाचा निर्णय तुम्हाला देतील.

  11. ते आपला निर्णय देतील आणि ते सांगतील त्याप्रमाणे अगदी तंतोतंत तुम्ही करावे. याहवेहने निवडलेल्या स्थानी त्यांनी दिलेला निर्णय तुम्ही अगदी तंतोतंत पाळावा. त्यांनी तुम्हाला जे काही करण्यास सांगितले आहे ते सर्व करण्याची काळजी घ्या.

  12. ते तुम्हाला जे काही शिकवतील व जो निर्णय ते देतील, त्याच्या उजवीकडे वा डावीकडे न वळता, तो अंमलात आणावा.

  13. याहवेह तुमच्या परमेश्वराने निवडलेला, त्यावेळी पदावर असलेल्या न्यायाधीशाचा अथवा याजकांचा निर्णय न पाळण्याचे धाडस जो कोणी करेल, त्याला मृत्यूची शिक्षा दिली जावी. अशा रीतीने इस्राएलातून तुम्हाला ही दुष्टाई काढून टाकता येईल.

  14. “ ‘डोळ्याबद्दल डोळा व दाताबद्दल दात,’ असे म्हटलेले तुम्ही ऐकले आहे,

  15. पण मी तुम्हाला सांगतो, दुष्ट मनुष्याला प्रतिकार करू नका. तुमच्या एका गालावर कोणी चापट मारली तर दुसराही गाल पुढे करा.