मुख्य मजकुरावर जा

Antioch बद्दल बायबलमधील वचने

43 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. जो प्रत्येकजण विश्वास ठेवतो, तो त्यांच्याद्वारे सर्व पापांपासून मुक्त होतो, मोशेच्या नियमशास्त्राच्या आधारे ही गोष्ट पटवून देणे तुम्हाला शक्य झाले नव्हते.

  2. यास्तव सावध राहा, संदेष्ट्यांनी जे सांगितले ते तुमच्याबाबतीत होऊ नये:

  3. “ ‘निंदा करणार्‍यांनो, पाहा, विस्मित होऊन नष्ट व्हा, कारण आता मी तुमच्या काळात जे कार्य करणार आहे, त्याबद्दल तुम्हाला कोणी सांगितले तरी त्याच्यावर तुमचा विश्वास बसणार नाही.’”

  4. पौल व बर्णबा सभागृह सोडून जात होते त्यावेळी पुढील शब्बाथ दिवशी या गोष्टींबद्दल त्यांनी अधिक माहिती द्यावी, अशी लोकांनी त्यांना विनंती केली.

  5. मग सभा संपल्यावर अनेक यहूदी आणि यहूद्यांच्या संस्कृतीप्रमाणे धर्मांतर करून आलेले भक्त पौल व बर्णबा यांच्यामागे गेले व त्यांच्याबरोबर बोलणे केले. त्यांनी परमेश्वराच्या कृपेमध्ये सतत वाढत राहावे असे पौल आणि बर्णबाने त्यांना उत्तेजन दिले.

  6. पुढील शब्बाथाच्या दिवशी शहरातील जवळपास सर्वच लोक प्रभूचे वचन ऐकण्यासाठी एकत्रित झाले.

  7. परंतु यहूद्यांनी समुदाय पाहिला, तेव्हा त्यांना हेवा वाटला आणि पौल जे बोलत होता त्याला विरोध करून त्यांनी त्याची निंदानालस्ती केली.

  8. मग पौल आणि बर्णबा हे निर्भयपणे बोलले: “हे परमेश्वराचे वचन प्रथम तुम्हाला देण्याचे अगत्य होते. ज्याअर्थी तुम्ही ते नाकारले आहे आणि सार्वकालिक जीवनाकरिता तुम्ही स्वतः योग्य नाहीत असे दाखविले आहे, त्याअर्थी आम्ही गैरयहूदीयांकडे वळतो.

  9. यासाठी प्रभूने आम्हाला ही आज्ञा दिली आहे: “ ‘पृथ्वीच्या दिगंतापर्यंत तुमच्याद्वारे मिळणारे तारण लाभावे, म्हणून मी तुला गैरयहूदीयांसाठी त्यांचा प्रकाश केले आहे.’ ”

  10. गैरयहूदीयांनी जेव्हा हे ऐकले, तेव्हा ते आनंदित झाले आणि त्यांनी प्रभूच्या वचनाचा सन्मान केला व आणि ज्यांना सार्वकालिक जीवनासाठी नियुक्त करण्यात आले होते त्या सर्वांनी विश्वास ठेवला.

  11. प्रभूचे वचन सर्व प्रांतात पसरले.

  12. परंतु यहूदी पुढार्‍यांनी शहरातील उच्च वर्गातील धार्मिक स्त्रियांना व प्रमुख व्यक्तींना चिथविले. त्यांनी पौल व बर्णबा यांचा छळ करून त्यांना त्यांच्या प्रांतातून हाकलून दिले.

  13. तेव्हा त्यांनी इशारा म्हणून त्या शहराची धूळ तिथेच झटकून टाकली आणि ते इकुन्यास गेले.

  14. आणि शिष्य आनंदाने आणि पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले.

  15. तेव्हा काही यहूदी अंत्युखिया आणि इकुन्या येथून आले आणि त्यांनी समुदायाला त्यांच्या बाजूने करवून घेतले. त्यांनी पौलाला धोंडमार केला आणि तो मरण पावला आहे असे समजून त्याला शहराबाहेर फरफटत ओढून नेले.

  16. परंतु शिष्य त्याच्या अवतीभोवती उभे राहिले, तेव्हा तो उठला आणि पुन्हा त्या शहरात गेला. दुसर्‍या दिवशी तो आणि बर्णबा दर्बेकडे निघून गेले.

  17. त्यांनी त्या शहरात शुभवार्तेचा प्रचार करून मोठ्या संख्येने शिष्य बनविले. नंतर ते लुस्त्र, इकुन्या व अंत्युखिया या शहरात परत आले.

  18. त्यांनी शिष्यांना बळकटी येण्यासाठी आणि विश्वासात एकनिष्ठतेने टिकून राहण्यासाठी उत्तेजन दिले, कारण “परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी आपल्याला अनेक संकटातून गेले पाहिजे,” असे ते म्हणाले.