Skip to content

Ambition बद्दल बायबलमधील वचने

19 वचने · 22 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. की दुष्टाचा उल्हास हा अल्पकालीन आहे, देवहीन व्यक्तीचा आनंद क्षणभंगुर आहे.

  2. जरी देवहीन मनुष्याचा गर्व आकाशापर्यंत पोहोचला आणि त्याचे डोके आभाळाला जाऊन भिडले,

  3. तरी तो आपल्या स्वतःच्या विष्ठेप्रमाणे नष्ट होणार; जे त्याला ओळखीत होते, ते विचारीत राहतील, ‘तो कुठे आहे?’

  4. तो स्वप्नासारखा विरून जाईल आणि पुन्हा सापडणार नाही. रात्रीच्या दृष्‍टांताप्रमाणे तो नाहीसा होईल.

  5. ज्यांनी त्याला पाहिले होते, ते त्याला पुन्हा पाहणार नाहीत; त्याचे स्थान त्याच्याकडे पुन्हा पाहणार नाही.

  6. त्यांनी आपल्या जमिनीला स्वतःची नावे दिलेली असली, तरी त्यांची थडगीच त्यांची कायमची घरे होतील; ती त्यांची पिढ्यान् पिढ्या वसतिस्थाने असतील.

  7. परंतु लोकांची संपत्ती कितीही असली, तरी ते नाशवंत पशूसारखेच आहेत.

  8. ज्यांचा स्वतःवर भरवसा आहे, व जे त्यांच्याशी सहमत आहेत, त्यांचेही असेच होणार. सेला

  9. ते आपल्या कबरांमध्ये मेंढरांप्रमाणे पडून राहतात; मृत्यू त्यांचा मेंढपाळ होईल (प्रातःकाळी नीतिमान लोक प्रभुत्व करतील) त्यांचे देह कबरेत उतरतील, कारण त्यांना कोणताच आधार राहिला नाही.

  10. परंतु परमेश्वर मला मृत्यूच्या सामर्थ्यापासून सोडवतील आणि माझा स्वीकार करतील. सेला

  11. जेव्हा इतर लोक श्रीमंत होतात, त्यांच्या घराचे वैभव वाढेल, तेव्हा भेदरून जाऊ नका.

  12. कारण जेव्हा ते मरण पावतात, तेव्हा ते सोबत काहीही नेत नाहीत; त्यांचे वैभव त्यांच्या मागोमाग जाणार नाही.

  13. जेव्हा तो जिवंत होता, तेव्हा त्याने प्रशंसा प्राप्त केली— कारण मनुष्य समृद्ध झाल्यावर त्याची प्रशंसा केलीच जाते—

  14. तरी अखेरीस तो इतर प्रत्येकाप्रमाणे मरण पावतो आणि तो जीवनाचा प्रकाश कधीही पाहणार नाही.

  15. समज नसलेल्या मनुष्याजवळ संपत्ती असली, तरी तो नाशवंत पशूसारखाच आहे.

  16. पहाटेच्या ताऱ्या, सूर्योदयाच्या पुत्रा! तू स्वर्गातून कसा पडला आहेस, तू, ज्याने एकेकाळी राष्ट्रांना खाली पाडले, तू पृथ्वीवर फेकला गेला आहेस!

  17. तू तुझ्या अंतःकरणात म्हणाला, “मी स्वर्गात चढून जाईन; मी माझे सिंहासन परमेश्वराच्या ताऱ्यांपेक्षा उंच करेन; मी लोकसभेच्या पर्वतावरील सिंहासनावर बसेन, झाफोनच्या सर्वात उंच पर्वतावर मी स्थानापन्न होईन.

  18. मी ढगांच्या शिखरांवर जाईन; मी स्वतःला सर्वोच्च परमेश्वरासारखे करेन.”

  19. परंतु आता तू मृतांच्या अधोलोकात, खोल खाईत लोटला गेला आहेस.