मुख्य मजकुरावर जा

Gate

5 verses

31.7700, 35.2300 गूगल नकाशावर पाहा

Gate चा उल्लेख असलेली वचने

  1. इस्राएलाचा राजा यहोआशने यहूदीयाचा राजा अहज्याहचा पुत्र, योआशाचा पुत्र अमस्याहला बेथ-शेमेश येथे कैद केले. नंतर योआश यरुशलेमास गेला आणि यरुशलेमची एफ्राईमच्या दरवाजापासून कोपर्‍याच्या दरवाजापर्यंत भिंत त्याने पाडून टाकली; जी चारशे हात लांब होती.

  2. इस्राएलाचा राजा यहोआशने यहोआहाजचा पुत्र, योआशाचा पुत्र यहूदीयाचा राजा अमस्याहला बेथ-शेमेश येथे कैद केले. नंतर योआशाने त्याला यरुशलेमास आणले आणि यरुशलेमची एफ्राईमच्या दरवाजापासून कोपर्‍याच्या दरवाजापर्यंत भिंत त्याने पाडून टाकली; जी चारशे हात लांब होती.

  3. उज्जीयाहने यरुशलेममध्ये कोपऱ्याच्या फाटकाजवळ, खोऱ्यांच्या फाटकाजवळ आणि दोन भिंतीच्या कोपऱ्याजवळ बुरूज बांधले आणि त्यांची तटबंदी केली.

  4. याहवेह जाहीर करतात, “असे दिवस येत आहेत, कोपर्‍यातील हनानेलच्या बुरुजापासून कोपर्‍याच्या वेशीपर्यंत या नगरीची पुनर्बांधणी होईल.

  5. यहूदीयाच्या उत्तरेकडील सीमेपासून म्हणजे गेबापासून ते दक्षिणेकडील सीमेपर्यंतची म्हणजे रिम्मोन पर्यंतची सर्व भूमी अराबासारखी शुष्क होईल, परंतु यरुशलेम उंचावल्या जाईल, बिन्यामीनच्या वेशीपासून पहिल्या वेशीपर्यंत व कोपर्‍याच्या वेशीपर्यंत आणि हनानेलाच्या बुरुजापासून शाही द्राक्षकुंडांपर्यंत असेल व या स्थानावर ते अचल राहील.