मुख्य मजकुरावर जा

Heber

4 वचने · 1 कुटुंब सदस्य

Heber चा उल्लेख असलेली वचने

  1. आता हेबेर केनीने मोशेचा मेहुणा होबाबचे गोत्र व इतर केनी लोकांना सोडले आणि केदेशजवळ साननीम येथील मोठ्या एलावृक्षाजवळ आपला तंबू ठोकला.

  2. सिसेरा तर केनी हेबेराची पत्नी याएलच्या डेर्‍याकडे पायी पळून गेला, कारण हासोरचा राजा याबीन आणि केनी हेबेरच्या घराण्यात सलोखा होता.

  3. सिसेरा थकून झोपलेला होता, परंतु हेबेराची पत्नी याएलने डेर्‍याची मेख आणि हातोडा घेतला आणि हळूच त्याच्याजवळ जाऊन त्याच्या कानशिलात तिने मेख ठोकली व ती आरपार जाऊन जमिनीत रुतून बसली आणि तो मरण पावला.

  4. “स्त्रियांमध्ये सर्वाधिक आशीर्वादित याएल, केनी हेबेरची पत्नी, तंबूत राहणार्‍या स्त्रियांमध्ये सर्वात धन्य.