- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
स्तोत्रसंहिता६
Listen to this chapter
0:00
0:00
दया व न्यायाच्या शिक्षेपासून सुटकेसाठी विनंती
१
संगीत दिग्दर्शकासाठी; तंतुवाद्यावरचे शेमीनीथ वर आधारित दावीदाचे स्तोत्र. याहवेह, रागाने माझा निषेध करू नका, तीव्र क्रोधाने मला शासन करू नका.
२
मजवर दया करा, कारण हे याहवेह, मी दुर्बल आहे; मला रोगमुक्त करा, कारण माझ्या हाडात तीव्र वेदना होत आहेत.
३
माझा आत्मा अत्यंत यातनेत आहे. याहवेह, तुम्ही किती विलंब लावणार?
स्तुतीसाठी जीवनाची आवश्यकता
४
याहवेह, परत येऊन मला सोडवा; तुमच्या दयेनुसार मला वाचवा.
५
मृतलोकात तुमचे स्मरण नाही; गर्तेमध्ये तुमचे उपकारस्मरण कोण करणार?
शत्रूंमुळे आलेला थकवा व शोक
६
माझ्या कण्हण्याने मी खंगून गेलो आहे. रात्रभर रडण्याने मी माझे अंथरूण भिजून ओलेचिंब करतो. माझ्या अश्रूंनी माझा बिछाना भिजून जातो.
७
दुःखाने माझे डोळे निस्तेज झाले आहेत; माझ्या शत्रूंमुळे माझी दृष्टी क्षीण झाली आहे.
देवाच्या उत्तरावरील विश्वास
८
दुष्टाई करणार्यांनो, येथून चालते व्हा, कारण याहवेहनी माझे रडणे ऐकले आहे.
९
याहवेहनी माझ्या दयेची याचना ऐकली आहे; याहवेह माझ्या प्रार्थना स्वीकार करतील.
१०
माझे सर्व शत्रू भय आणि लज्जा पावतील; ते मागे फिरतील आणि तत्काळ लज्जित होतील.
Use ← → arrow keys to navigate
Settings
Reading Style
Typeface
Font Size px
Reading Width chars
Options
Study Note