- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
इय्योब२६
Listen to this chapter
0:00
0:00
ईयोब बिल्ददचा दुर्बल सल्ला नाकारतो
१
नंतर इय्योबाने उत्तर देऊन म्हटले:
२
“तुम्ही दुर्बळाचे कसे साहाय्य केले! एखाद्या शक्ती नसलेल्या हाताला कसे संरक्षण दिले!
३
बुद्धिहीनाला तुम्ही काय सल्ला दिला! आणि कोणते प्रचंड अंतर्विचार तुम्ही सादर केले आहे!
४
असे शब्द बोलण्यास तुम्हाला कोणी साहाय्य केले? आणि कोणाचा आत्मा तुमच्या मुखाद्वारे बोलला आहे?
निर्मितीतील देवाचे अतुलनीय सामर्थ्य
५
“जे मेलेले आहेत ते मोठ्या यातनांमध्ये आहेत, जे जलांमध्ये आणि जलांच्या खाली राहतात ते सुद्धा तसेच आहे.
६
मृतांचे जग परमेश्वरापुढे उघडे आहे; त्यांच्या दृष्टीपासून नाश लपलेला नाही.
७
परमेश्वर उत्तरेकडील नभोमंडळ मोकळ्या अंतरिक्षावर पसरवितात; आणि पृथ्वी निराधार टांगली आहे.
८
आपल्या घनदाट मेघांमध्ये ते जल कोंडून ठेवतात, तरीही त्यांच्या वजनाने आभाळ फाटत नाहीत.
९
त्यांनी आपले मेघ पसरवून, पौर्णिमेच्या चंद्राचे मुख झाकले आहे.
१०
त्यांनी जलांवर क्षितिज नेमून ठेवले आहे प्रकाश व अंधकारासाठीही सीमा आखून दिल्या आहेत.
११
परमेश्वराच्या धमकावण्याने आकाशातील स्तंभ थरथरतात, त्यांच्या धाकाने ते भयचकित होतात.
१२
आपल्या शक्तीने ते सागर घुसळून टाकतात; आणि आपल्या बुद्धीच्या बलाने राहाबाचे तुकडे तुकडे करतात.
१३
केवळ त्यांच्या श्वासाने आकाशाला सौंदर्य लाभते; त्यांच्या हाताने वेगाने सळसळणार्या सर्पाला विंधले आहे.
१४
परमेश्वर करतात त्यातील या तर केवळ किरकोळ गोष्टी आहेत; आम्ही मात्र त्यांचा कानोसा घेऊ शकतो! त्यांच्या सामर्थ्याचा गडगडाट कोण समजू शकणार?”
Use ← → arrow keys to navigate
Settings
Reading Style
Typeface
Font Size px
Reading Width chars
Options
Study Note