Blasphemy बद्दल बायबलमधील वचने: Punishment of
Punishment of बद्दल वचने
“म्हणून हे मानवपुत्रा, इस्राएली लोकांशी बोल आणि त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: याबाबतीत तुमच्या पूर्वजांनी सुद्धा माझ्याशी अविश्वासू राहून दुर्भाषण केले होते:
जो देश मी त्यांना शपथ वाहून देऊ केला होता, त्यात जेव्हा मी त्यांना आणले आणि त्यांनी एखादे उंच डोंगर किंवा दाट पानांनी भरलेले झाड पाहिले, तिथे त्यांनी यज्ञ केले, माझा राग पेटेल अशी अर्पणे त्यांनी केली, त्यांचे सुवासिक धूप सादर करीत त्यांची पेयार्पणे ओतली.
तेव्हा मी त्यांना म्हणालो: हे उच्च पूजास्थान जिथे तुम्ही जाता ते काय आहे?’ ” (आजवर त्या ठिकाणास बामाह म्हणतात.)
“म्हणून इस्राएली लोकांना सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तुमच्या पूर्वजांप्रमाणे तुम्हीदेखील स्वतःला अशुद्ध करून आणि त्यांच्या घृणास्पद मूर्तींची वासना बाळगणार काय?
जेव्हा तुम्ही तुमच्या भेटी सादर करता, म्हणजेच तुमच्या लेकरांचा अग्नीत यज्ञ करता; तुम्ही तुमच्या मूर्तींमुळे असेच स्वतःला अशुद्ध करीत राहता. अहो इस्राएल लोकहो, तुम्ही माझ्याकडे विचारपूस करावी असे मी होऊ द्यावे काय? सार्वभौम याहवेह जाहीर करतात, माझ्या जिवाची शपथ, मी तुम्हाला माझ्याकडे विचारपूस करू देणार नाही.
“ ‘तुम्ही म्हणता, “राष्ट्रांप्रमाणे, जगाच्या लोकांप्रमाणे आम्हाला व्हायचे आहे, जे लाकूड व दगडाची सेवा करतात.” परंतु तुमच्या मनात जे आहे, ते कधीही घडणार नाही.
सार्वभौम याहवेह जाहीर करतात, माझ्या जिवाची शपथ, बलवान हाताने, उगारलेल्या बाहूने व क्रोधाची वृष्टी करीत मी तुमच्यावर राज्य करेन.