Skip to content
सफन्याह ३:१४-२०

परमेश्वर सियोनवर आनंद मानतो

सफन्याह ३:१४-२०
१४
हे सीयोनकन्ये, तू गीत गा; हे इस्राएला, तू मोठ्याने गजर कर! अगे यरुशलेमकन्ये, अगदी मनापासून आनंद कर, उल्लास कर.
१५
कारण याहवेहने तुझी शिक्षा काढून घेतली आहे, तुझ्या शत्रूचे सैन्य परत गेले आहे. याहवेह, इस्राएलचे राजा तुझ्यासह आहेत; यापुढे हानीचे भय तू बाळगणार नाही.
१६
त्या दिवशी ते यरुशलेमला असे म्हणतील, “हे सीयोना, भिऊ नकोस, तुझे बाहू दुर्बल होऊ देऊ नकोस.
१७
महाप्रतापी योद्धा जे रक्षणकर्ता आहेत, ते याहवेह तुझे परमेश्वर तुझ्यासह आहेत. त्यांना तुझ्यामुळे अत्यंत आनंद होतो; तुझ्यावरील प्रीतीमुळे ते तुजवर दोषारोपण करणार नाहीत. त्याऐवजी तुझ्याबद्दल ते गीत गाऊन उल्हास व्यक्त करतील.”
१८
“जे निर्धारित सण तुझ्याकरिता ओझे व कलंक आहेत, ते सण साजरे करता आले नाही म्हणून जे लोक शोक करतात, त्या सर्वांना मी तुझ्यामधून काढून टाकेन.
१९
त्या समयी ज्यांनी तुझ्यावर जुलूम केला त्यांना मी अतिशय कडक शिक्षा करेन. त्या सर्वांचा मी जाब घेईन. जे लंगडे आहेत त्यांची मी सोडवणूक करेन; बंदिवासात गेलेल्यांना मी एकत्र करेन. जिथे ते लज्जित झाले त्या प्रत्येक भूमीवर त्यांना मी प्रशंसा व गौरव बहाल करेन.
२०
त्यावेळी मी तुम्हा सर्वांना एकत्र गोळा करेन; त्यावेळी मी तुम्हाला घरी परत आणेन. जेव्हा मी तुमची संपन्नता तुम्हाला परत देईन तेव्हा पृथ्वीवरील सर्व लोकांमध्ये, स्वतःच्या दृष्टीसमोर मी तुम्हाला गौरव व प्रशंसा बहाल करेन,” असे याहवेह म्हणतात.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options