मुख्य मजकुरावर जा
जखऱ्याह १२:१०-१४

कृपेचा आत्मा व राष्ट्रीय पश्चात्ताप

जखऱ्याह १२:१०-१४
१०
“मग मी दावीदाच्या घराण्यावर व यरुशलेमच्या सर्व रहिवाशांवर कृपेचा आणि विनंतीचा आत्मा ओतेन आणि ज्याला त्यांनी भोसकले त्या माझ्याकडे ते पाहतील आणि एकुलत्या एका पुत्रासाठी करावा, तसा ते त्याच्यासाठी शोक करतील आणि प्रथम पुत्रासाठी करावा, तसा ते त्याच्यासाठी विलाप करतील.
११
त्या दिवशी यरुशलेमातील आकांत इतका मोठा असेल, जसा मगिद्दोच्या खोर्‍यात ठार झालेल्या हदाद-रिम्मोनासाठी होता.
१२
संपूर्ण इस्राएल राष्ट्र दुःखाने आक्रंदन करेल, प्रत्येक गोत्र, ते स्वतः व त्यांच्या पत्नींसहः दावीदाच्या घराण्याचे गोत्र व त्यांच्या पत्नी, नाथानाच्या घराण्याचे गोत्र व त्यांच्या पत्नी,
१३
लेवी घराण्याचे गोत्र व त्यांच्या पत्नी, शिमी घराण्याचे गोत्र व त्यांच्या पत्नी,
१४
आणि राहिलेले सर्व गोत्र व त्यांच्या पत्नी.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options