गीतरत्न ६:४-१०
४
माझ्या प्रिये, तू तिरजाह नगरीसारखी सुंदर आहेस, जसे यरुशलेम मनोहर आहे, जसे ध्वज फडकविणारे विजयी सैन्य तशी तू ऐश्वर्यशाली आहे.
५
माझ्यावरून तू आपली दृष्टी काढ; कारण तुझे नयन मला भारावून सोडतात. तुझे केस गिलआद डोंगरावर चकाकणार्या शेळ्यांच्या कळपाप्रमाणे आहेत.
६
तुझे दात नुकत्याच धुतलेल्या मेंढरांच्या कळपाप्रमाणे आहेत. प्रत्येकाला आपले जुळे आहेत, त्यात एकही उणा नाही.
७
ओढणीआड असलेले तुझे गाल डाळिंबाच्या दोन फोडींप्रमाणे आहेत.
८
तिथे साठ राण्या, आणि ऐंशी उपपत्नी, आणि कुमारिका तर असंख्य असतील;
९
पण हे माझ्या कबुतरे, तू परिपूर्ण, व निराळी आहेस, तिच्या आईची एकुलती एक कन्या असून, जिने तिला जन्म दिला तिची लाडकी आहे. तरुण स्त्रियांनी तिला पाहून, धन्य म्हटले; राण्या व उपपत्नी यांनी देखील तिची प्रशंसा केली.
१०
जो पहाटेसारखा प्रसन्न, चंद्रासारखा मनोरम, सूर्यासारखा प्रकाशमान, मिरवणुकीतील तार्यासारखे गौरवी दिसणारे असे हे कोण आहे?
Settings