Skip to content
रोमकरांस १४:७-२३

रोमकरांस १४:७-२३

७
कारण आपल्यातील कोणी स्वतःकरिता जगत नाही आणि कोणी स्वतःकरिता मरत नाही.
८
आपण जगतो ते प्रभूकरिता जगतो; आणि आपण मरतो ते प्रभूकरिता मरतो; म्हणून आपण जगलो किंवा मेलो, तरी प्रभूचे आहोत.
९
ख्रिस्त याचसाठी मृत्यू पावले व पुन्हा जिवंत झाले की त्यांनी मेलेल्यांचा व जिवंतांचाही प्रभू असावे.
१०
तर तू आपल्या बंधूला व भगिनीला दोषी का ठरवितोस? किंवा तू आपल्या बंधूला तुच्छ का मानतोस? आपणा सर्वांस परमेश्वराच्या न्यायासनासमोर उभे राहवयाचे आहे.
११
कारण असे लिहिले आहे: “ ‘प्रभू म्हणतात, मी जिवंत आहे म्हणून,’ ‘प्रत्येक गुडघा माझ्यापुढे टेकला जाईल; आणि प्रत्येक जीभ परमेश्वराचा स्वीकार करेल.’ ”
१२
तर मग आपल्यातील प्रत्येकजण स्वतःचा हिशोब परमेश्वराला देईल.
१३
यास्तव आपण यापुढे एकमेकांना दोषी ठरवू नये; तर असा निश्चय करावा की कोणी आपल्या बंधू किंवा भगिनीपुढे काही विघ्न किंवा अडखळण ठेवू नये.
१४
मला ठाऊक आहे आणि प्रभू येशूंमध्ये माझी खात्री आहे, की कोणताही पदार्थ मूळचा अशुद्ध नाही; तरी अमुक पदार्थ अशुद्ध आहे, असे समजणार्‍यासाठीच तो अशुद्ध आहे.
१५
तुझ्या बंधूला किंवा भगिनीला अन्नामुळे क्लेश झाले तर तू प्रीतीने वागेनासा झाला आहेस. ज्यासाठी ख्रिस्त मरण पावले त्यांचा नाश तुझ्या खाण्यामुळे करू नको.
१६
तुमच्या दृष्टीने जे चांगले ते तुम्हाला माहीत आहे, त्याबद्दल वाईट बोलण्याचा प्रसंग आणू नका.
१७
परमेश्वराचे राज्य खाणे व पिणे यात नाही, तर नीतिमत्व, शांती व पवित्र आत्म्याद्वारे मिळणारा आनंद यात आहे.
१८
कारण जो अशाप्रकारे ख्रिस्ताची सेवा करतो तो परमेश्वराला संतोष देणारा व मनुष्यांनी पारखलेला आहे.
१९
तर मग जेणेकरून शांती व परस्परांची वृद्धी होईल अशा गोष्टींच्या मागे आपण लागावे.
२०
अन्नामुळे परमेश्वराच्या कामाचा नाश करू नका. सर्व अन्न शुद्धच आहे; परंतु जो व्यक्ती काहीही खाण्यामुळे इतरांना अडखळवितो त्याला ते वाईट आहे.
२१
मांस न खाणे, द्राक्षारस न पिणे किंवा जे योग्य नाही असे काहीही करू नका की जेणेकरून तुझे बंधू व भगिनी पापात पडतील.
२२
तुझ्याठायी जो विश्वास आहे तो तू परमेश्वरासमक्ष आपणाजवळ ठेव. आपणाला जे काही पसंत आहे त्याविषयी ज्याला स्वतःचा न्यायनिवाडा करावा लागत नाही तो धन्य,
२३
पण संशय धरून जो कोणी व्यक्ती मग तो पुरुष व स्त्री, खातो तो दोषी ठरतो, कारण त्याचे खाणे विश्वासाने नाही; आणि जे काही विश्वासाने नाही ते पाप आहे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options