Skip to content
रोमकरांस १:३

रोमकरांस १:३

आजूबाजूच्या संदर्भासह वचन दाखवत आहे.
मी पौल, ख्रिस्त येशूंचा दास, प्रेषित होण्यास पाचारलेला आणि परमेश्वराच्या शुभवार्तेसाठी वेगळा केलेला
ज्या शुभवार्तेविषयी पवित्रशास्त्रलेखात त्यांनी आपल्या संदेष्ट्यांद्वारे आधी अभिवचन दिले होते.
त्यांच्या पुत्राविषयी, जे शारीरिक दृष्टीने दावीदाचे वंशज होते,
ते आपले प्रभू येशू ख्रिस्त, जे पवित्रतेच्या आत्म्याद्वारे व मृतांच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने परमेश्वराचे पुत्र ठरविले गेले.
त्यांच्याद्वारे आम्हाला कृपा व प्रेषितपण मिळाले आहे; ते यासाठी की सर्व गैरयहूदीयांनी त्यांच्या नावाकरिता विश्वासाने आज्ञापालन करणारे व्हावे.
तुम्ही सुद्धा त्या गैरयहूदीयांमधून येशू ख्रिस्ताचे होण्यासाठी बोलाविलेले आहात.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options