Skip to content
रोमकरांस १:१०-१५

रोमकरांस १:१०-१५

१०
माझ्या प्रार्थनेमध्ये मी सर्वदा प्रार्थना करतो की शेवटी का होईना परमेश्वराची इच्छा असेल तर तुमच्याकडे येण्याचा माझा मार्ग मोकळा व्हावा.
११
तुम्ही बळकट व्हावे म्हणून तुम्हाला आध्यात्मिक देणगी प्रदान करावी यासाठी भेटण्यास मी उत्कंठित झालो आहे—
१२
तर एकमेकांच्या विश्वासाकडून मला व तुम्हालाही उत्तेजन मिळावे.
१३
बंधूंनो व भगिनींनो, इतर गैरयहूदीयांमध्ये मला जशी पीकप्राप्ती झाली, तशी तुम्हामध्येही व्हावी म्हणून मी तुमच्याकडे येण्याचा अनेकदा निश्चय केला, पण आतापर्यंत मला प्रतिबंध करण्यात आला, हे तुम्हाला कळावे अशी माझी इच्छा आहे.
१४
कारण ग्रीक व बर्बर, तसेच शहाणे व मूर्ख या दोघांचाही मी ॠणी आहे.
१५
यामुळे तुम्ही जे रोममध्ये आहात त्या तुम्हालाही शुभवार्ता सांगण्यास मी एवढा उत्सुक झालो आहे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options