Skip to content
प्रकटीकरण ९:१३-१९

प्रकटीकरण ९:१३-१९

१३
नंतर सहाव्या देवदूताने आपला कर्णा वाजविला, तेव्हा परमेश्वराच्या राजासनासमोरील सोन्याच्या वेदीच्या चारही शिंगातून निघालेली एक वाणी मी ऐकली.
१४
ज्या सहाव्या देवदूताजवळ रणशिंग होते त्याला ती म्हणाली, “यूफ्रेटीस नदीवर बांधून ठेवलेल्या चारही देवदूतांना मोकळे कर.”
१५
आणि एकतृतीयांश मनुष्यजात ठार मारण्याकरिता नेमलेली घटका, दिवस, महिना व वर्ष यासाठी तयार केलेले हे चार देवदूत मोकळे करण्यात आले.
१६
घोडदळाची संख्या वीस कोटी होती. मी त्यांची संख्या ऐकली.
१७
त्या दृष्टान्तात घोडे व स्वार मला दिसले ते असे: त्यांना अग्नीसारखी लाल, गडद निळ्या रंगाची व गंधकासारखी पिवळ्या रंगांची ऊरस्त्राणे होती. त्या घोड्यांची डोकी सिंहांच्या डोक्यांसारखी होती आणि त्यांच्या तोंडामधून अग्नी, धूर व गंधक हे सर्व निघत होते,
१८
आणि त्या पीडामुळे एकतृतीयांश मानवजात मारली गेली.
१९
त्या घोड्यांची शक्ती त्यांच्या तोंडात व शेपटांत आहे. त्यांच्या शेपट्या सापांसारख्या असून त्यांनाही डोकी आहेत आणि त्यांच्या साहाय्याने ते जखमा करतात.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options