Skip to content
प्रकटीकरण ५:१-७

प्रकटीकरण ५:१-७

जे राजासनावर बसले होते, त्यांच्या उजव्या हातात पाठपोट लिहिलेली ग्रंथपटाची गुंडाळी मी पाहिली. ती गुंडाळी सात शिक्के मारून बंद केली होती.
एक बलवान देवदूत मोठ्याने घोषणा करीत होता: “हे शिक्के फोडून, या ग्रंथपटाची गुंडाळी उघडावयास पात्र असा कोणी आहे का?”
पण स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वीच्या खाली, कोणीही ती गुंडाळी उघडण्यास किंवा त्यात लिहिलेले पाहण्यास समर्थ नव्हता.
तेव्हा मी फार रडलो. कारण ती गुंडाळी उघडावयास किंवा त्यात पाहावयास योग्य असा कोणीही सापडला नाही.
पण त्या चोवीस वडिलांपैकी एकजण मला म्हणाला, “रडू नकोस! कारण पाहा, यहूदाह वंशाचा सिंह, दावीदाचा मूळ विजयी झाला आहे. सातही शिक्के फोडून ती गुंडाळी उघडण्यास तो समर्थ आहे.”
मग मी पाहिले, ते राजासन, ते चोवीस वडीलजन व ते चार सजीव प्राणी यांच्या मध्यभागी वध झाल्यासारखा कोकरा उभा असलेला मला दिसला. कोकर्‍याला सात शिंगे, सात डोळे, असून, ते जगाच्या प्रत्येक भागात पाठविलेले परमेश्वराचे सात आत्मे आहेत.
कोकरा पुढे आला, आणि जे राजासनावर बसले होते, त्यांच्या उजव्या हातातून त्याने ती गुंडाळी घेतली.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options