Skip to content
प्रकटीकरण १०:१-४

प्रकटीकरण १०:१-४

मग मी आणखी एक पराक्रमी देवदूत, स्वर्गातून उतरतांना पाहिला. त्याने मेघांचे वेष्टण घातले होते. त्याच्या मस्तकाच्या वरती मेघधनुष्य होते; त्याचा चेहरा सूर्यासारखा तेजस्वी होता आणि त्याचे पाय अग्नी स्तंभासारखे होते.
त्याच्या हातात उघडलेली एक छोटी गुंडाळी होती. त्याने आपला उजवा पाय समुद्रावर व डावा पाय जमिनीवर ठेवला.
मग त्याने सिंहगर्जनेसारखी एक मोठी गर्जना केली, तेव्हा सात मेघगर्जनांनी प्रत्युत्तर दिले.
त्या सात मेघगर्जनांनी उच्चारलेले शब्द मी लिहून ठेवणार होतो; तेवढ्यात स्वर्गातून एक वाणी मला म्हणाली, “थांब, लिहू नकोस. त्यांचे शब्द मोहरबंद कर, आताच ते प्रकट करावयाचे नाहीत.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options