प्रकटीकरण १०:५-७
५
मग समुद्र व जमीन यावर उभे राहिलेल्या त्या बलवान देवदूताने आपला उजवा हात स्वर्गाकडे उंचाविला.
६
आणि जे युगानुयुग जिवंत आहे, ज्यांनी आकाश व त्यातील सर्वकाही, पृथ्वी व तिच्यातील सर्वकाही, समुद्र व त्यातील सर्व जलचर निर्माण केले, त्यांची शपथ वाहून म्हटले, “आता अधिक विलंब लागणार नाही!
७
पण सातवा देवदूत आपले रणशिंग वाजविण्याच्या बेतात असेल त्या दिवसात, आपले सेवक व संदेष्टे यांना कळविल्याप्रमाणे युगानुयुग गुप्त ठेवलेली परमेश्वराची रहस्यमय योजना साध्य होईल.”
Settings