Skip to content
स्तोत्रसंहिता ८६:११-१७

स्तोत्रसंहिता ८६:११-१७

११
हे याहवेह, तुमचे मार्ग मला शिकवा, म्हणजे तुमच्या विश्वासूपणावर मी भरवसा ठेवेन; मला एकचित्त हृदय प्रदान करा, म्हणजे मी तुमच्या नावाचे भय बाळगेन.
१२
माझ्या प्रभू परमेश्वरा, मी माझ्या संपूर्ण हृदयाने तुमचे स्तवन करेन; मी तुमच्या नामाला सदासर्वकाळ गौरव देईन.
१३
कारण माझ्यावर तुम्ही अत्यंत प्रीती करता; अधोलोकाच्या तळापासून तुम्ही माझे प्राण सोडविले आहेत.
१४
हे परमेश्वरा, उन्मत्त शत्रू माझ्यावर हल्ला करतात; निर्दयी लोकांची टोळी माझा जीव घेण्याचा प्रयत्न करीत आहे— त्यांना तुमची काहीही कदर नाही.
१५
परंतु हे प्रभू, तुम्ही कृपाळू व दयाळू परमेश्वर आहात, मंदक्रोध, अति करुणामय आणि विश्वसनीयतेने संपन्न आहात.
१६
माझ्याकडे वळून मजवर दया करा; आपल्या सेवकाच्या वतीने आपले सामर्थ्य दाखवून द्या; माझे तारण करा, कारण माझ्या आईप्रमाणेच मी देखील तुमची सेवा करतो.
१७
तुमची माझ्यावरील कृपा दाखविणारे चिन्ह मला द्या, म्हणजे माझे शत्रू ते पाहतील व लज्जित होतील, कारण हे याहवेह, तुम्ही मला साहाय्य केले आणि माझे समाधान केले.

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.