स्तोत्रसंहिता ८६:८-१०
८
हे प्रभू, सर्व दैवतांमध्ये तुमच्यासारखा परमेश्वर कुठेही नाही; तुमची महत्कृत्ये अतुलनीय आहेत.
९
हे प्रभू, तुम्ही निर्माण केलेली सर्व राष्ट्रे, तुमच्यासमोर सन्मानाप्रत येतील व तुमची आराधना करतील; तुमच्या पवित्र नामाची थोरवी गातील.
१०
कारण तुम्ही महान आहात आणि अद्भुत चमत्कार करता; तुम्हीच एकटे परमेश्वर आहात.
Settings