स्तोत्रसंहिता ५०:७-१३
७
“ऐका, माझ्या लोकांनो ऐका, मी बोलत आहे; इस्राएला, मी तुझ्याविरुद्ध साक्ष देत आहे: मी परमेश्वर, तुझा परमेश्वर आहे.
८
तुझ्या अर्पणासंबंधी आणि होमार्पणाबद्दल माझी काहीही तक्रार नाही, ते नियमित माझ्यापुढे आहेतच.
९
मी तुमच्या गोठ्यातील बैल आणि मेंढवाड्यातील बोकड यज्ञपशू म्हणून घेणार नाही.
१०
कारण वनातील सारे प्राणी माझे आहेत; हजारो टेकड्यांवरील गुरे माझी आहेत;
११
पर्वतावरील सर्व पक्षी मला माहीत आहेत, भूमीवरील सर्व प्राणीही माझेच आहेत.
१२
मी भुकेला असलो, तरी तुमच्याकडे खावयाला मागणार नाही, कारण संपूर्ण जग आणि त्यातील सर्वकाही माझे आहे.
१३
बैलाचे मांस माझा आहार आहे का किंवा बोकडांचे रक्त माझे पेय आहे का?
Settings