Skip to content
स्तोत्रसंहिता ३१:९-१४

स्तोत्रसंहिता ३१:९-१४

याहवेह, मजवर दया करा, कारण मी संकटात आहे; माझे डोळे दुःखाने थकलेले आहेत; शोकाने माझा देह व माझा आत्मा ढासळला आहे.
१०
दुःखामुळे माझे आयुष्य व कण्हण्यामुळे माझी वर्षे कमी होत आहेत; पापांनी माझी शक्ती शोषून घेतली आहे; माझी हाडे झिजून गेली आहेत.
११
माझ्या सर्व शत्रूंमुळे माझे शेजारी माझा तिरस्कार करतात आणि माझ्या जवळच्या मित्रांची मला भीती वाटते— जे मला रस्त्यावर पाहताच माझ्यापासून दूर पळून जातात.
१२
एखाद्या मृत मनुष्यासारखा माझा विसर पडला आहे; एखाद्या फुटलेल्या भांड्यासारखी माझी अवस्था झाली आहे.
१३
कारण अनेकांना कुजबुजतांना मी ऐकले आहे. “सर्व बाजूने दहशत आहे!” ते माझ्याविरुद्ध कट रचीत आहे आणि माझा जीव घेण्यासाठी ते तयार आहेत.
१४
परंतु याहवेह, माझा भरवसा तुमच्यावर आहे. मी म्हणालो, “तुम्हीच माझे परमेश्वर आहात.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options