Skip to content
स्तोत्रसंहिता ११९:४९-५२

स्तोत्रसंहिता ११९:४९-५२

४९
तुमच्या सेवकाला दिलेल्या अभिवचनाचे स्मरण करा, कारण तुम्हीच मला आशा दिली आहे;
५०
माझ्या संकटात माझे सांत्वन हे आहे: तुमचे अभिवचन माझ्या जीवनाचे जतन करते.
५१
गर्विष्ठ लोक निर्दयपणे माझा उपहास करतात, तरी मी तुमच्या नियमशास्त्रापासून ढळत नाही.
५२
याहवेह, तुमच्या प्राचीन आज्ञांचे मी स्मरण करतो, व त्यापासून माझे सांत्वन होते.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options