मुख्य मजकुरावर जा
स्तोत्रसंहिता ११९:१२१-१२८

आइन: जुलूम करणाऱ्यांपासून सुटका हाच न्याय

स्तोत्रसंहिता ११९:१२१-१२८
१२१
मी धर्माचरणाने व न्यायीपणाने वागलो आहे; माझा छळ करणार्‍यांच्या हाती मला सोपवू नका.
१२२
आपल्या सेवकाचे कल्याण सुनिश्चित करा; गर्विष्ठांना माझा छळ करू देऊ नका.
१२३
माझ्या तारणाचे तुमचे नीतियुक्त अभिवचन पूर्ण होण्याची वाट पाहता माझे डोळे अंधुक झाले आहेत.
१२४
आपल्या प्रेमदयेस अनुसरून तुमच्या सेवकाशी व्यवहार करा आणि मला तुमचे नियम शिकवा.
१२५
मी तुमचा दास आहे; मला विवेकबुद्धी द्या, म्हणजे तुमचे नियम समजतील.
१२६
हे याहवेह, तुम्ही कृती करण्याची वेळ आली आहे; तुमच्या नियमांचे उल्लंघन होत आहे.
१२७
कारण मी तुमच्या आज्ञा सोन्यापेक्षा, बावन्नकशी सोन्यापेक्षाही अधिक प्रिय मानतो,
१२८
कारण तुमचा प्रत्येक नियम यथायोग्य मानतो; म्हणून सर्व असत्य मार्गाचा मी द्वेष करतो.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options