Skip to content
स्तोत्रसंहिता ११९:१२९-१३६

स्तोत्रसंहिता ११९:१२९-१३६

१२९
तुमचे नियम अद्भुत आहेत; म्हणून मी त्यांचे पालन करतो.
१३०
तुमचे वचन उलगडल्याने प्रकाश मिळतो; ते साध्याभोळ्यांना शहाणपण देते.
१३१
माझे मुख उघडून मी धापा टाकल्या, कारण तुमच्या आदेशाची मला आस लागली होती.
१३२
मजकडे वळा आणि माझ्यावर दया करा, जशी तुमच्या नामावर प्रीती करणार्‍यांवर तुम्ही नेहमी करता, तशी करा.
१३३
तुमच्या वचनानुसार माझ्या पावलांचे मार्गदर्शन करा, म्हणजे पाप मजवर सत्ता गाजविणार नाही.
१३४
मनुष्याच्या अत्याचारापासून मला सोडवा, म्हणजे मला तुमच्या आज्ञा पाळता येतील.
१३५
तुमच्या सेवकावर आपला मुखप्रकाश पडू द्या, आणि तुमचे सर्व नियम मला शिकवा.
१३६
माझ्या डोळ्यांतून अश्रूंचे ओघ वाहतात, कारण तुमच्या नियमांचे उल्लंघन करण्यात येत आहे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options