Skip to content
स्तोत्रसंहिता ११९:१३७-१४४

त्सादे: देवाची नीतिमत्ता व स्तोत्रकर्त्याचा आवेश

स्तोत्रसंहिता ११९:१३७-१४४
१३७
हे याहवेह, तुम्ही न्यायी आहात, आणि तुमचे नियमही अचूक आहेत.
१३८
तुम्ही योजलेले अधिनियम अत्यंत नीतियुक्त आहेत; ते पूर्णपणे विश्वसनीय होत.
१३९
माझा आवेश मला पार झिजवित आहे, कारण माझे शत्रू तुमचे नियम उपेक्षितात.
१४०
तुमची अभिवचने पूर्णपणे पारखली गेली आहेत, म्हणूनच तुमच्या सेवकाला ती अतिशय प्रिय आहेत.
१४१
मी स्वतः महत्त्वहीन व तिरस्कृत असलो, तरी तुमचे नियम मी विसरत नाही.
१४२
तुमची धार्मिकता सार्वकालिक आहे, आणि तुमचे नियम सत्य आहेत.
१४३
संकट आणि क्लेशाने मला घेरले आहे, परंतु तुमच्या आज्ञा मला सुखावतात.
१४४
तुमचे नियम सर्वदा न्याय्य असतात; ते समजण्यास मला साहाय्य करा म्हणजे मी जगेन.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options