नीतिसूत्रे ६:२६-३५
२६
कारण एका भाकरीचे मोल देऊन वेश्या मिळू शकते, परंतु दुसर्या मनुष्याची पत्नी तुझ्या जीविताची शिकार करते.
२७
मनुष्याने आपल्या उराशी निखारे बाळगले, तर त्याची वस्त्रे जळून जाणार नाहीत काय?
२८
मनुष्य जळत्या कोळशावरून चालल्यास त्याचे पाय पोळणार नाहीत काय?
२९
तो असा मनुष्य आहे जो दुसर्याच्या पत्नीबरोबर व्यभिचार करतो; तिला स्पर्श करणार्या कोणाही मनुष्याला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही.
३०
भुकेला असताना भूक भागविण्यासाठी जो चोरी करतो, त्याचा लोक तिरस्कार करीत नाहीत.
३१
तरीही जर तो चोर सापडला जातो, तर त्याला सातपट भरपाई करावी लागते, त्याला त्याच्या घरातील सर्व संपत्ती विकावी लागते.
३२
परंतु जो मनुष्य जारकर्म करतो त्याच्याकडे समज नसते; जो कोणी तसे करतो तो स्वतःचाच नाश करतो.
३३
त्याला घाव आणि अप्रतिष्ठा प्राप्त होतील, आणि त्याची निंदा कधीही पुसली जाणार नाही.
३४
कारण मत्सर नवर्यास संतप्त करतो आणि जेव्हा तो सूड घेतो, तेव्हा तो दयामाया दाखविणार नाही.
३५
तो कोणतीही नुकसान भरपाई स्वीकारणार नाही; कितीही मोठी लाच असली तरी ती तो घेण्यास नकार देईल.
Settings