Skip to content
नीतिसूत्रे ६:१-१८

नीतिसूत्रे ६:१-१८

१
माझ्या मुला, जर तू तुझ्या शेजार्‍याला जामीन राहिला आहेस, जर अनोळखी व्यक्तीचे कर्ज फेडण्यास तू वचनबद्ध झालास,
२
तर तू जे काही बोललास, त्यामुळे तू जाळ्यात सापडला आहेस, तुझ्या मुखातील वचनाने तू स्वतःला पाशात गुंतवून घेतले आहेस.
३
म्हणून माझ्या मुला, स्वतःला सोडवून घेण्यासाठी तू असे कर, कारण तू तुझ्या शेजार्‍याच्या हाती सापडला आहेस: तर आता स्वतःला विनम्र करून त्याच्याकडे जा, आणि तुझ्या शेजार्‍याची झोप उडवून टाक!
४
तुझ्या डोळ्यांना झोप येऊ देऊ नकोस, तुझ्या पापण्यास डुलक्या घेऊ नयेत.
५
शिकार्‍याच्या हातातून निसटलेल्या हरिणासारखे, पारध्याच्या जाळ्यातून सुटलेल्या पक्ष्याप्रमाणे तू स्वतःला मुक्त कर.
६
अरे आळशा, मुंगीकडे जा; तिचे मार्ग लक्षात घे आणि शहाणा हो!
७
तिला कोणीही अधिकारी, मुकादम किंवा अधिपती नाही,
८
तरी ती तिचा अन्नसामुग्रींचा साठा उन्हाळ्यात करते आणि कापणीच्या हंगामात तिचे अन्न गोळा करते.
९
परंतु हे आळशी माणसा, तू तिथे किती वेळ झोपून राहशील? तुझ्या झोपेतून तू केव्हा जागा होणार आहेस?
१०
आणखी थोडीशी झोप, आणखी थोडीशी डुलकी उशाखाली हात घेऊन थोडी विश्रांती—
११
आणि दारिद्र्य एका चोराप्रमाणे तुझ्यावर येईल आणि हत्यारबंद मनुष्याप्रमाणे गरिबी येईल.
१२
त्रास देणारा आणि दुष्कर्मी मनुष्य, जो विपरीत गोष्टी बोलत फिरतो,
१३
तो आपले डोळे मिचकावितो, आपल्या पायांनी इशारे करतो, आणि आपल्या हाताच्या बोटांनी खुणावतो.
१४
जो त्याच्या हृदयात फसवणुकीच्या दुष्ट योजना करतो— तो नेहमीच भांडणाला चेतावणी देतो.
१५
म्हणून त्याच्यावर अचानक आपत्ती येईल; अकस्मात त्याचा नाश होईल, त्यावर कोणताही इलाज नसेल.
१६
याहवेह सहा गोष्टींचा द्वेष करतात, त्यांना सात गोष्टींचा तिटकारा वाटतो:
१७
गर्विष्ठ नजर, खोटे बोलणारी जीभ, हात, जे निष्पाप व्यक्तीचा रक्तपात करतात,
१८
हृदय, जे दुष्ट योजना करते पाय, जे दुष्कृत्य करण्यासाठी वेगाने धावतात.

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.

Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options