Skip to content
नीतिसूत्रे ४:१-१३

नीतिसूत्रे ४:१-१३

१
माझ्या मुलांनो, वडिलांचा बोध ऐका; त्याकडे लक्ष द्या आणि समंजसपणा मिळवा.
२
मी तुम्हाला उत्तम शिक्षण देतो, म्हणून माझ्या शिक्षणाचा त्याग करू नका.
३
कारण मी सुद्धा माझ्या वडिलांचा पुत्र होतो, अजूनही सुकुमार आणि आईच्या प्रेमात वाढलेला.
४
तेव्हा त्यांनी मला शिकविले आणि ते मला म्हणाले, “तुझ्या संपूर्ण अंतःकरणापासून माझ्या वचनांकडे लक्ष लाव; माझ्या आज्ञांचे पालन कर आणि तुला आयुष्य लाभेल.
५
सुज्ञान मिळव, समंजसपणा प्राप्त कर; माझी वचने विसरू नकोस किंवा त्यांच्यापासून दूर जाऊ नकोस.
६
सुज्ञानाचा त्याग करू नकोस आणि ती तुझे रक्षण करेल; तिच्यावर प्रीती कर आणि ती तुझे रक्षण करेल.
७
सुज्ञानाची सुरवात अशी आहे: सुज्ञान मिळव. जरी तुझ्याकडे जे आहे ते सर्व खर्च करावे लागले तरी समंजसपणा मिळव.
८
तू जर तिला उराशी जतन करशील तर ती तुला उंचावेल. ज्ञानाला दृढ आलिंगन दे मग ती तुला सन्मान देईल;
९
ती तुझ्या मस्तकांवर फुलांचा मुकुट देईल, आणि एक सुशोभित मुकुट तुला सादर करेल.”
१०
माझ्या मुला ऐक, मी काय म्हणतो ते स्वीकार, आणि तुझ्या आयुष्याची वर्षे पुष्कळ होतील.
११
मी तुला सुज्ञान मार्गाचे शिक्षण देतो, आणि तुला सरळ वाटेने चालवितो.
१२
जेव्हा तू चालशील तेव्हा तुझी पावले लटपटणार नाहीत; जेव्हा तू धावशील, तू अडखळणार नाहीस.
१३
बोधवचने अंमलात आण, ती सोडून देऊ नकोस; त्यांचे चांगले रक्षण कर, कारण त्यातच तुझे जीवन आहे.

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.