नीतिसूत्रे ३:२७-३५
२७
ज्यांचे भले करण्याचे तुझ्या आटोक्यात असले, तर ते करण्यास नाकारू नकोस.
२८
एखादी वस्तू तुझ्याजवळ असताना “तू जा आणि उद्या परत ये, म्हणजे मी ती तुला देईन” असे तुझ्या शेजार्याला म्हणू नकोस.
२९
तुझा शेजारी तुझ्याजवळ विश्वासाने राहत असताना, त्याचे वाईट करण्याचे योजू नकोस.
३०
जर एखाद्या मनुष्याने तुझे वाईट केले नसेल, तर निष्कारण त्याच्यावर आरोप करू नकोस.
३१
हिंसा करणार्यांचा हेवा करू नकोस, किंवा त्यांच्या कोणत्याही मार्गाची निवड करू नकोस.
३२
कारण याहवेहना कुटिलपणाबद्दल घृणा वाटते, परंतु जो नीतिमान आहे त्याला ते विश्वासपात्र मानतात.
३३
याहवेहचा शाप दुष्ट मनुष्याच्या घरावर असतो, परंतु नीतिमानाचे घर ते आशीर्वादित करतात.
३४
उपहास करणार्या गर्विष्ठांचा ते उपहास करतात, परंतु जे नम्र आणि पीडित आहेत त्यांच्यावर ते कृपा करतात.
३५
ज्ञानी लोकांना सन्मानाचा वारसा मिळतो, परंतु मूर्खांना फक्त लज्जा मिळते.
Settings