Skip to content
नीतिसूत्रे ३:२१-२६

ज्ञान सुरक्षितता व शांती देते

नीतिसूत्रे ३:२१-२६
२१
माझ्या मुला, सुज्ञान आणि शहाणपण तुझ्यापासून दूर जाऊ देऊ नकोस, खरे न्यायीपण आणि विवेक जपून ठेव;
२२
तीच तुझ्यासाठी जीवन असतील, ती तुझ्या गळ्याला कृपेचा अलंकार असतील.
२३
मग तू तुझ्या मार्गाने सुरक्षित चालशील, आणि तुझा पाय अडखळणार नाही.
२४
तू जेव्हा विसावा घेशील, तेव्हा तुला भीती वाटणार नाही; जेव्हा तू झोपशील, तुला गोड झोप लागेल.
२५
अचानक आलेल्या संकटाला तू भिऊ नकोस, किंवा दुष्टांचा नाश होत असला तरी भिऊ नकोस;
२६
कारण याहवेह तुझ्या बाजूला असतील आणि ते तुझा पाय पाशात अडकू देणार नाहीत.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options