Skip to content
नीतिसूत्रे २७:१७-२२

परस्पर सुधारणा व मानवी स्वभाव

नीतिसूत्रे २७:१७-२२
१७
जशी लोखंडाने लोखंडाला धार लागते, त्याप्रमाणे एक मनुष्य दुसर्‍याला सुधारतो.
१८
जो अंजिराच्या झाडाची राखण करतो, तो त्या झाडाचे फळ खाईल. आणि जे त्यांच्या मालकाचे संरक्षण करतात त्यांचा सन्मान होईल.
१९
पाणी जसे चेहर्‍याचे प्रतिबिंब दर्शविते, तसेच व्यक्तीचे जीवन त्याचे अंतःकरण दर्शविते,
२०
मृत्यू आणि विध्वंस यांचे कधीही समाधान होत नाही, तसेच मनुष्याच्या नेत्रांचेही नव्हे.
२१
चांदी मुशीत आणि सोने भट्टीत पारखले जाते, तशी लोकांची पारख, त्यांच्या प्रशंसेद्वारे होते.
२२
मूर्खाचा तुम्ही कुटणीमध्ये भुगा केला, मुसळात त्याला धान्यासारखे भरडले, तरी त्याची मूर्खता तुम्हाला वेगळी करता येणार नाही.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options