नीतिसूत्रे २७:११-१६
११
माझ्या मुला, शहाणा हो आणि माझे हृदय आनंदित कर; म्हणजे जे मला तिरस्काराने वागवितात, मी त्यांना उत्तर देऊ शकेन.
१२
सुज्ञ मनुष्य धोका ओळखतो आणि आश्रयास जातो, परंतु भोळा मनुष्य पुढे जात राहतो आणि दंड भोगतो.
१३
जो अनोळखी व्यक्तीला जामीन राहतो त्याचे वस्त्र काढून घे; जर ते परक्यासाठी केले असेल तर ते गहाण म्हणून घे.
१४
जर कोणी आपल्या शेजाऱ्याला भल्या पहाटे ओरडून अभिवादन केले, तर ते त्याला शापासारखे वाटेल.
१५
भांडखोर पत्नी ही पावसाळ्यात गळक्या छप्परासारखी आहे.
१६
तिला ताब्यात ठेवणे म्हणजे वार्याला ताब्यात ठेवण्यासारखे, किंवा हाताने तेल धरण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे.
Settings