Skip to content
नीतिसूत्रे २३:६-९

कृपण यजमान व मूर्खाचे कान

नीतिसूत्रे २३:६-९
६
कंजूष यजमानाचे अन्न खाऊ नकोस, त्याच्या स्वादिष्ट अन्नाची हाव धरू नकोस;
७
कारण तो अशा प्रकारचा व्यक्ती आहे जो नेहमीच किमतीबद्दल विचार करीत असतो. तो तुला म्हणतो “खा आणि पी” परंतु त्याचे मन तुझ्यावर नसते.
८
जे थोडेफार तू जेवला असशील ते ओकून टाकशील आणि तू केलेली प्रशंसा व्यर्थ होईल.
९
मूर्ख माणसांबरोबर बोलू नकोस, कारण ते तुझ्या समंजस शब्दांचा तिरस्कार करतील.

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.