Skip to content
नीतिसूत्रे २३:२-८

नीतिसूत्रे २३:२-८

आणि जर तू खादाड असशील तर तुझ्या गळ्यावर सुरी लाव.
त्याच्या स्वादिष्ट पदार्थांची हाव धरू नकोस, कारण ते भोजन फसविणारे आहे.
श्रीमंत होण्यासाठी स्वतःला झिजवू नकोस; स्वतःच्या चातुर्यावर भरवसा ठेऊ नकोस.
तू श्रीमंतीकडे नजर टाकताच, ते निघून गेलेले असते, कारण पंख उगवताच गरुडाप्रमाणे ते आकाशात उडून जाईल.
कंजूष यजमानाचे अन्न खाऊ नकोस, त्याच्या स्वादिष्ट अन्नाची हाव धरू नकोस;
कारण तो अशा प्रकारचा व्यक्ती आहे जो नेहमीच किमतीबद्दल विचार करीत असतो. तो तुला म्हणतो “खा आणि पी” परंतु त्याचे मन तुझ्यावर नसते.
जे थोडेफार तू जेवला असशील ते ओकून टाकशील आणि तू केलेली प्रशंसा व्यर्थ होईल.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options