मुख्य मजकुरावर जा
नीतिसूत्रे २३:१९-२५

दारूबाजी व खादाडपणा टाळा

नीतिसूत्रे २३:१९-२५
१९
माझ्या मुला, ऐक आणि सुज्ञ हो आणि तुझे अंतःकरण योग्य मार्गात स्थिर कर:
२०
जे अतिमद्यपान करतात किंवा जे आधाशीपणे मांस खातात त्यांची संगत करू नको,
२१
कारण मद्यपी व खादाड गरीब होतात, आणि गुंगीत असणार्‍यांना फाटके कपडे घालावे लागतील.
२२
आपल्या वडिलांचे ऐक ज्याने तुला जीवन दिले, आणि तुझी आई वृद्ध झाल्यावर तिचा तिरस्कार करू नको.
२३
सत्याला मोलाने विकत घे आणि ते विकू नको— सुज्ञान, शिक्षण आणि समंजसपणासुद्धा मिळव.
२४
नीतिमान मुलाच्या वडिलांना फार आनंद होतो; जो मनुष्य सुज्ञ पुत्राचा पिता आहे त्यामध्ये तो उल्लसित असतो.
२५
तुझे वडील आणि आई आनंदी असावेत; आणि जिने तुला जन्म दिला ती हर्षित असो!
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options