Skip to content
नीतिसूत्रे १९:१०-१५

नीतिसूत्रे १९:१०-१५

१०
मूर्खाने ऐषारामात राहणे उचित नाही— तसेच गुलामाने राजपुत्रावर अधिकार गाजविणे योग्य नाही!
११
मनुष्याची सुज्ञता त्याला मंदक्रोधी राखते; आणि चुकांकडे दुर्लक्ष करणे त्याची प्रतिष्ठा असते.
१२
राजाचा क्रोध सिंहाच्या गर्जनेसारखा असतो, परंतु त्याची कृपादृष्टी गवतावरील दवबिंदूसारखी असते.
१३
मूर्ख संतान म्हणजे वडिलांच्या नाशाचे कारण आहे. आणि भांडखोर पत्नी ही सतत ठिबकणार्‍या गळक्या छप्परासारखी आहे.
१४
पूर्वजांपासून वारसांना घरेदारे व संपत्ती मिळते, परंतु समंजस पत्नी याहवेहपासून मिळते.
१५
आळस मनुष्याला गाढ झोप आणतो आणि लक्ष्यहीन मनुष्य उपाशी राहतो.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options