Skip to content
नीतिसूत्रे १९:१६-१९

शिस्त, उदारता व आज्ञाधारकपणा

नीतिसूत्रे १९:१६-१९
१६
जे याहवेहच्या आज्ञा पाळतात, ते आपला जीव सुरक्षित ठेवतात, परंतु जे आपल्या वर्तनाविषयी निष्काळजी असतात, ते मृत्युमुखी पडतात.
१७
जो गरिबांना मदत करतो, तो याहवेहला उसने देतो, आणि त्यांच्या सत्कृत्याबद्दल याहवेह परतफेड करतील.
१८
तुझ्या मुलांना शिस्त वेळेवर लाव, कारण त्यातच आशा आहे; परंतु शिस्त मर्यादे पलीकडे जाऊ नये, जेणेकरून त्यात त्याला मृत्युच येईल.
१९
तापट मनुष्याला त्याच्या कृतीची शिक्षा भोगावीच लागते; त्यांना सोडविलेस, तर तुम्हाला पुन्हा तेच करावे लागेल.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options