नीतिसूत्रे १७:२४
आजूबाजूच्या संदर्भासह वचन २४ दाखवत आहे.
२१
जो मूर्खाला जन्म देतो तो दुःखाला पाचारण करतो, आणि देवहीन मूर्खाच्या पालकांना आनंद मिळत नाही.
२२
आनंदी मन औषधाप्रमाणे हितकर असते, पण खिन्न मन हाडे शुष्क करते.
२३
न्यायाचे पारडे फिरविण्यासाठी, दुष्ट मनुष्य गुप्त रीतीने लाच घेतो.
२४
समंजस मनुष्याची दृष्टी ज्ञानावर केंद्रित असते, पण मूर्खाची नजर पृथ्वीच्या शेवटपर्यंत सैरभैर फिरत असते.
२५
मूर्ख मुलगा आपल्या वडिलांच्या दुःखास कारणीभूत होतो, आणि ज्या आईने त्याला जन्म दिला तिला क्लेश देतो.
२६
निर्दोषांना दंड देणे योग्य नव्हे, तसेच प्रामाणिक अधिपतींना शिक्षा करणे हे निश्चितच चुकीचे आहे.
२७
ज्ञानी संयमाने शब्दाचा वापर करतो, आणि समंजस शांत स्वभावाचा असतो.
Settings