मुख्य मजकुरावर जा
नीतिसूत्रे १७:१-६

घरातील शांती व प्रामाणिकपणा

नीतिसूत्रे १७:१-६
कलहाच्या वातावरणात मेजवानी खाण्यापेक्षा शांती व समाधानाने भाकरीचा कोरडा तुकडा खाणे बरे.
सुज्ञ गुलाम आपल्या धन्याच्या लज्जास्पद मुलावर सत्ता गाजवील, आणि कुटुंब सभासदाप्रमाणे मालमत्तेत वाटा मिळवील.
चांदी मुशीत आणि सोने भट्टीत पारखले जाते, परंतु अंतःकरणाची पारख याहवेहच करतात.
दुष्ट व्यक्ती फसवणूक करणार्‍याचे भाषण ऐकतो; लबाड बोलणारा मनुष्य विनाशकारी जिभेचे लक्ष देऊन ऐकतो.
जो गरिबांची चेष्टा करतो, तो त्याच्या निर्माणकर्त्याचा अनादर करतो; जो दुसर्‍यांवर आलेल्या संकटामध्ये आनंद करतो, त्याला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही.
वयस्क माणसांची नातवंडे त्यांचे गौरवी भूषण आहेत; आणि मुलांचे भूषण त्यांचे मातापिता आहेत.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options