Skip to content
नीतिसूत्रे १६:२५-३३

नीतिसूत्रे १६:२५-३३

२५
एक मार्ग असा आहे जो योग्य वाटतो; परंतु तो शेवटी मृत्यूकडे नेतो.
२६
परिश्रम करणार्‍यांना भूक लागणे योग्य; भूक भागविण्यासाठी त्यांना काम करण्याची प्रेरणा मिळते.
२७
अधम वाईट योजना करतो, आणि त्यांच्या ओठांवर ती होरपळणाऱ्या अग्नीसारखी असते.
२८
विकृत मनुष्य कलहास चेतावणी देतो, आणि निंदानालस्ती जिवलग मित्रांना सुद्धा विभक्त करते.
२९
हिंसा करणारा आपल्या शेजार्‍याला मोहात पाडतो आणि त्याला कुमार्गावर जाण्यास प्रेरित करतो.
३०
जो कोणी त्याचे डोळे मिचकावतो तो विकृत योजना करीत असतो; जो कोणी त्याचे ओठ चावतो, तो वाईट प्रवृत्तीचा आहे.
३१
पांढरे केस गौरवी मुकुट आहे; नीतिमत्तेच्या मार्गात चालल्याने तो लाभतो.
३२
योद्धा असण्यापेक्षा शांत स्वभावी असणे बरे, शहर जिंकून घेणार्‍यापेक्षा स्वतःवर ताबा ठेवणारा उत्तम.
३३
आपण पदरात नाणेफेक करतो, पण त्याचा प्रत्येक निर्णय याहवेहच्या हाती असतो.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options