मुख्य मजकुरावर जा
नीतिसूत्रे १४:२८-३५

राज्यकारभाराची तत्त्वे

नीतिसूत्रे १४:२८-३५
२८
वाढती लोकसंख्या राजाचे वैभव आहे; पण लोकच नसले तर अधिपती नष्ट होतो!
२९
जो सहनशील आहे, तो मोठा शहाणा आहे; पण उतावळ्या स्वभावाचा मनुष्य मूर्खता प्रकट करतो.
३०
शांत हृदय शरीर निरोगी ठेवते; परंतु ईर्षा हाडे कुजविते.
३१
गरिबांवर जुलूम करणारा आपल्या उत्पन्नकर्त्याचा अपमान करतो; पण ज्यांना गरजवंताची दया येते, ते परमेश्वराचा सन्मान करतात.
३२
नीतिमान माणसे मृत्युक्षणीही परमेश्वरात आश्रयस्थान शोधतात. पण जेव्हा संकट येते तेव्हा दुर्जन चिरडले जातात.
३३
सुज्ञता विवेकी माणसाच्या हृदयास विश्रांती आणते; पण मूर्खासही ती स्वतःची ओळख करून देते.
३४
नीतिमत्ता राष्ट्राची उन्नती करते. पण पाप कोणत्याही लोकास निंदनीय ठरविते.
३५
सुज्ञ सेवक राजाला प्रसन्न करतो, परंतु निर्लज्ज सेवक राजास क्रोधिष्ट करतो.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options