नीतिसूत्रे १४:२०-२५
२०
गरिबांना त्यांचे शेजारीसुद्धा टाळतात, परंतु श्रीमंतांना मात्र खूप मित्र असतात.
२१
शेजार्यांचा द्वेष करणे पाप आहे; परंतु जे गरजवंतावर दया करतात ते धन्य!
२२
वाईट योजना करणारे मार्ग चुकत नाहीत काय? परंतु चांगल्या योजना करणार्यांना प्रीती आणि विश्वासूपणा मिळतो.
२३
सर्व कष्टाच्या कामाने नफा मिळतो, पण व्यर्थ बडबड भिकेला लावते.
२४
सुज्ञांची संपत्ती त्यांचा मुकुट असतो, परंतु मूर्खांची मूर्खता केवळ मूर्खताच उत्पन्न करते.
२५
सत्य सांगणारा साक्षीदार प्राण वाचवितो, परंतु खोटा साक्षीदार विश्वासघातकी आहे.
Settings